गडचिरोली च्या शासकीय कार्यालयात महिलेचा विनयभंग

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ,न्यूज जागर

दि.२१/११/२०२२

गडचिरोली

गडचिरोली येथील एका शासकीय कार्यालयात आरोपी हा मोठ्या पदावर असून असून तो नेहमीच आपल्या सहकारी महिलेस कोणत्या ना कोणत्या कारणाने बोलावून ,तिच्या शरीराशी लगट करण्याचा प्रयत्न करीत होता, पीडितेने प्रतिबंध करताच सी.आर.खराब करण्याची आणि नौकरीतून काढून टाकण्याची सतत धमकी देत होता. पिडीतेच्या तक्रार वरुन पोस्टे गडचिरोली येथे आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये व अनु.जा.ज. अत्या. प्रति.अधिनीयम प्रमाणे गुन्हा नोंद केला .

पिडीत महिला हि तक्रार दाखल करण्यास गेली असता त्यांना मुद्धाम ताटकळत ठेवण्याचा प्रकार गडचिरोली पोलीस स्टेशन मध्ये झालेला आहे असे एका राजकीय पक्षाच्या महिला नेत्यास कळले तेव्हा त्यांनी याची माहिती मा. पोलीस अधीक्षकांना दिली , तेव्हा लगेच पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत आरोपीवर गुन्हा नोंद करून अटक करण्याचे निर्देश दिले       officer molested his junior lady

गुन्हयातील आरोपी हा चंद्रपुर रोड कडील परीसरात लपुन बसला असल्याची गोपनीय माहीती मिळाली,  त्या आधारे पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवुन आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे.