पिकअप आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ,न्यूज जागर

दि. २१/११/२०२२

ब्रम्हपुरी  

करण धनीराम माकडे वय 24 वर्षे रा. झिलबोडी, हा मालडोंगरी येथे  मावशीकडुन दुध आणण्यासाठी दुचाकीने गेला असतां परत येत असतांना समोरुन पिकअपने दुचाकीला जब्बर धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मालडोंगरी रोडवर सोमवारी (दि. 21 नोव्हेंबर) रोजी सकाळच्या सुमारास घडली. One Death In Road Accident at Maldongari (Bramhapuri)

सदर घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला देण्यात आली. घटनास्थळावर पोलीस पोहचुन मुत्युदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.