श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२३/११/२०२२ पाथरी
गावा लगतच्या बोळीत एका २२वर्षीय युवकाने झाडाला फासी लावुन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली आहे.
सदर घटना पाथरी पोलीस स्टेशन हद्दीतील गेवरा बुज येथील असुन निखिल हिवराज शेरकुरे वय २२ वर्ष असे मृतक युवकाचे नाव आहे.
मृतक निखिल हा पुणे येथील एका खाजगी कंपनीत रोजगाराला असुन मागील अकरा नोव्हेंबरला सुट्टी घेवुन तो गेवरा बुज येथील आपल्या घरी आला होता,दोन दिवसांपुर्वी परिसरातील नातेवाहीकांकडे भेटी करीता जावुन वापस गेवरा येथे परत आला व २५ नोहेंबरला पुणे येथे जाण्यासाठी तयारी केली, घरच्या आई वडीलांसोबत व्यवस्थीत बोलणे करुण सहज बाहेर जावुण येतो म्हणुन घरुन गेला.घरच्यांना कुठलीही भनक लागु न देता निखील गावाजवळील एका बोडी कडे गेला, व एका झाडाला गळफास लावुन आत्महत्या करुन घेत जिवन संपविले. काही वेळातच रस्त्याने जाणाऱ्या लोकांच्या दृष्टीस निखील झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला ,घटनेची माहीती पाथरी पोलीसांना देण्यात आली,लगेच पाथरीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड आपल्या पोलीस कर्मचारी मोहुर्ले. योगेश देशमुख यांचेसह घटनास्थळी पोहचले, घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रेत ताब्यात घेत शवविच्छेदना साठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहे.