चामोर्शी:- तालुक्यातील मुरखळा चक येथील प्रबुद्ध हायस्कूलचे कर्मचारी हरिदास देशमुख हे सेवेतून निवृत्त झाल्यामुळे त्यांचा आष्टी कार्नर हनुमान मंदिरचे अध्यक्ष काशिनाथ पिपरे यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी देवस्थानचे संयोजक प्र. सो. गुंडावार गुरुजी, विजय कोमेरवार, मिठूराम दुधबळे, जोगेश्वर मरस्कोले, विश्वेश्वर देशमुख, प्रकाश ताटीवार, बबन वडेट्टीवार, गणेश राऊत, जगदीश दूधबळे आदी उपस्थित होते यावेळी प्र.सो.गुंडावार गुरुजी यांनी हरिदास देशमुख यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना ते आपली नौकरी सांभाळून हनुमान मंदिरात होणाऱ्या सर्व कार्यक्रमात हिरहिरीने सहभाग घेऊन सहकार्य करत होते त्यांचे कार्य प्रशंसनीय असून आता ते सेवानिवृत्त झाल्यामुळे मंदिरात पूर्णवेळ देऊन कार्यक्रमातपूर्ण वेळ सहभाग घेतील अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेचछा दिल्या