देशी दारू चा साठा जप्त , आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अन्वये गुन्हा नोंद

चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

दि.२९/११/२०२२

दिनांक 27/11/2022 रोजी मा. उप विभागीय पोलिस अधिकारी सा. गडचिरोली यांचे मार्गदर्शनात पो. स्टे. चामोर्शीचे पो.उप. नि. सुधीर साठे, पो.हवा./ सुभाष भोयर, पो.ना./ज्ञानेश्वर लाकडे, पो.शी./ बंडू बारसागडे यांनी मिळालेल्या गोपनीय खबरे वरून मौजा – चामोर्शी येथील इसम नामे  नागेंद्र सोमनाथ चीचघरे वय 38 वर्ष याचे राहते घराची दोन पंचासमक्ष दारूबंदी बाबत पाहणी केली असता त्याचे रहाते घरात 90 मिली मापाच्या देशी दारूच्या 1200 नग निपा, प्रती निप अवैध विक्री किंमत 60/- रू. प्रमाणे एकूण 72,000/- रू. चा मुद्देमाल चिल्लर दारू विक्रेत्यांना पुरवठा करण्याचे उद्देशाने बाळगलेला मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला व पो.उप.नी. सुधीर साठे यांचे फिर्याद वरून पो. स्टे. चामोर्शी येथे नमूद आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पो.हवा. सुभाष भोयर, पो. स्टे. चामोर्शी हे करीत आहेत