बंगाली बांधवांचा बार्टी मार्फत झालेल्या सर्वेक्षणाचा अहवाल केंद्राला पाठवा-आ.डॉ.देवरावजी होळी

गडचिरोली  जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतली सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंतजी भांगे यांची भेट

दिनांक १ डिसेंबर २०२२ गडचिरोली

आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या प्रयत्नातून गडचिरोली चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील बंगाली समाजाचे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे च्या माध्यमातून झालेले आहे माञ हा अहवाल अजुन पर्यंत केंद्र सरकारला पाठविण्यात न आल्याने बंगाली समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न रखडलेला आहे. करिता त्या सर्वेक्षणाचा अहवाल केंद्र सरकारला लवकरात लवकर पाठवण्यात यावा अशी विनंती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंतची भांगे यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन केली.

गडचिरोली, चंद्रपूर गोंदिया जिल्ह्यात विस्थापित झालेला बंगाली समाज मोठ्या प्रमाणात निवासी आहे. या समाजाच्या सामाजिक आरक्षणाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून या समाजाच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टीच्या माध्यमातून तयार करण्यात आला. ह्या सर्वेक्षणाचा अहवाल केंद्र सरकारला पाठविणे आवश्यक आहे . राज्यातील भाजपा शिवसेना युतीचे सरकारने लवकरात लवकर हा अहवाल केंद्र सरकारला पाठवावा जेणेकरून या समाजातील आरक्षणाचा प्रश्न निकाली लागण्यास मदत मिळेल अशी मागणी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंतजी भांगे यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन केली.