हनुमानगर च्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे, नागरिकात संतापाचे वातावरण, चामोर्शी – येथील हनुमान नगरातील नागरिकांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या निवासस्थानाच्या अगदी हाकेवर असलेल्या हनुमान नगर ला जाणारा मुख्य रस्ता हा या भागातील नागरिकांसाठी डोकेदुखी चा ठरला आहे. मुख्यमार्गापासून तर जुन्या तहसील कार्यालयापर्यंत हा मुख्य रस्ता आहे या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. हनुमान नगरच्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर रस्त्यावर तळे साचलेले आहेत. दुचाकी वाहने, पायदळ चालणाऱ्यांना येथील रस्ता गेला कुठे असा प्रश्न पडला आहे. नागरिक हा फक्त मतदार राहिलेला आहे. नागरिक म्हणून पाहिजे असलेल्या मूलभूत गरजा, हक्क हे त्याला मागून सुद्धा मिळणे कठीण झाले आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, चांगला रस्ता, नियमित विजेची सोय, ना ल्या, साफसफाई या मूलभूत गरजा आता फक्त निवडणूक आल्यावरच दिसतात. म्हणून आम्हाला नगरसेवक नकोच, असा आवाज जनसामान्यातून दिसत आहे. रहिवासी आमदार याकडे लक्ष देतील का असाही सूर जनसामान्यातून उठत आहे.