चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
आमगाव महाल, दि. ३/१२/२०२२
मौजा आमगाव माहाल येथील सौ.प्रेमिला प्रेमसिंग बैस यांचे घरगुती मिटर असुन सहाय्यक अभियंता साकरकर यांनी काही राजकीय नेत्यांच्या दबावाखाली येऊन कसलिही शाहनिशा न करता सौ.प्रेमिला बैस यांच्या घरगुती मिटरचा वापर दुकानासाठी वापरत असल्याचे सांगून त्यां बिलावर अतिरिक्त पेनाल्टी वाढवुन दिली. त्यामुळे त्यानीं बिल न भरल्याने त्याचा विद्युत पुरवठा खंडित केला.असा मुजोरपणा दाखविनारा सहायक अभियंता साकरकर यांच्यावर त्वरित कारवाई करावी.अशी मागणी शिवसेना महिला तालुकाप्रमुख सौ.प्रेमिला बैस यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे.
सौ. प्रेमिला बैस यांच्याकडे दोन छोटे दुकानाचे गाळे असुन एकाकडे स्टुडिओ तर दुसरीकडे कटिंगचे दुकान आहे. त्यापैकी एक इन्व्हर्टरचा वापर करतो तर दुसरा घरुन चार्ज केलेला बल वापरतो त्यामुळे त्यांचा लाईटचा संबंध नसून सौ. प्रेमिला बैस यांचे कडून त्यांना कोणतेच कनेक्शन दिलेले नाही.असे असताना सुद्धा संबंधित सहाय्यक अभियंता यांनी काही ग्रामपंचायतचे आजी-माजी राजकीय पदाधिकारी यांच्या दबावात येऊन थातुरमातुर चौकशी केली व सौ.प्रेमिला बैस यांचे विरुद्ध साक्षीदाराच्या खोट्या सह्या करून त्यांचे घरगुती विद्युत खंडित केले. त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबांना आज अंधाराशी सामना करावा लागतो आहे.
त्या चामोर्शी येथील अतिरिक्त उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन येत्या काही दिवसात थकीत बिलाची थोडी रक्कम भरणार असे त्यांना तोंडी सांगितले असता, दुसऱ्या दिवशी लाईट पूर्ववत सुरू केली. परंतु गावातील राजकीय विरोधक ग्रा.प. सरपंच्या जोस्ना गव्हारे, उपसरपंच विनोद शेंगर, माजी ग्रा.प.सदस्य बाबुरावजी गट्टीवार, नाजुक वाळके,व विपिन चन्नावार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दबाव आणल्याने दुसऱ्याच दिवशी सहाय्यक अभियंत्यांनी सौ.प्रेमिला बैस यांची विद्युत खंडित केली.त्यामुळे बदनामी केल्याप्रकरणी त्या सहायक अभियंता साकरकर विरोधात न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले.
ग्रामपंचायतीचे उपसरपंच विनोद शेंगर यांचे वडील जयसिंग शेंगर यांच्या राहत्या घरी पंधरा वर्षापासून माॅ बमलेश्वरी बचत गटाच्या वतीने स्वस्त धान्य दुकान चालविले जाते त्यांच्याकडे मात्र विद्युत पुरवठा आवश्यकतेनुसार सुरू असतांना त्यांच्या दुकानाची चौकशी केली जात नाही, तसेच नंदाबाई वसंत चन्नावार यांचे खाजगी घरगुती मीटर अनेक वर्षांपासून बंद असून त्यांनी रस्ता क्रॉस करून दुसऱ्या व्यक्तीच्या बोरवेलला मोटर पंप बसवून अवैधरित्या घरचा विद्युत पुरवठा सुरू करुन मोहल्यातील अनेकांकडून पैसे घेऊन बोअरवेलचे पाणी देतो परंतु त्यांच्याकडे मात्र संबंधित विभागाने कानाडोळा केलेला आहे.
एकाला न्याय व दुसऱ्यावर अन्याय अशा निष्क्रिय व बेजबाबदार असलेल्या संबंधित सहाय्यक अभियंत्यावर कारवाई करून त्याला निलंबित करावे. अशी मागणी पत्रकार परिषदेतून शिवसेना महिला तालुकाप्रमुख सौ. प्रेमीला बैस, प्रेमसिंग बैस, शिवसेना तालुकाप्रमुख मनोज पोरटे,मंगला कड्यामी,लिलाबाई तोरे, पवन खोब्रागडे यांनी केलेली आहे
याबाबतीत सहाय्यक अभियंता साकरकर यांना विचारणा केली असता,
अनेक दिवसापासून त्यांच्याकडे बिल थकीत असून वरिष्ठांनी दिलेले आदेशानुसार बिल न भरल्यामुळे आपण त्यांचे घरगुती विद्युत खंडित केलेली आहे. त्यामुळे माझ्यावर केलेल्या आरोप चुकीचे व निरर्थक असून राजकीय भावनेतून करण्यात आलेले आहेत.