“मोबाईल विज्ञान प्रदर्शनी बस ” ने केले विद्यार्थ्यांना आकर्षित

श्री.भुवन भोंदे, प्रतिनिधी , न्यूज जागर

देसाईगंज , दि. ५/१२/२०२२

स्काय नेट पब्लिक स्कूल वडसा इथे रमण विज्ञान केंद्र एव तारामंडल यांच्यातर्फे स्वच्छता और स्वास्थ विषयावरती दोन दिवसीय फिरती प्रयोगशाळेचे आयोजन प्राचार्य ताज कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले विज्ञान प्रदर्शनी मध्ये स्वच्छता ही आपल्या दैनंदिन जीवनातील भाग आहे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असल्याने खूप सारे आजारापासून आपल्याला लांब राहता येतो याबद्दल माहिती देण्यात आली .तसेच अमर वास्के सरांनी विविध प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व समजविले रात्री दुर्बीण द्वारे विद्यार्थ्यांना आकाश दर्शन दिले व आकाशातील विविध ग्रहाबद्दल माहिती दिली.विज्ञान प्रदर्शनी मध्ये इतर शाळांनी तसेच पालकांनी यात सहभाग घेतला विज्ञान प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी शाळेतील 22 विद्यार्थ्यांच्या समूहाने तसेच शिक्षिका श्रुती निकुरे, विजया कुथे, फर्जना शेख, आफरीन खान यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.