श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
ब्रम्हपुरी, ७/१२/२०२२
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव ( चोप ) येथील रहिवासी असलेल्या एका युवतीने ब्रम्हपुरी न्यायालयासमोर आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
पौर्णिमा मिलिंद लाडे (वय २७) या युवतीने ब्रम्हपुरी न्यायालयासमोर नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या मुख्य गेट जवळ आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.दि.६/१२/२०२२ ला सकाळी तिचा मृतदेह गळफास लावून असलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.