श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
ग्रामपंचायत सदस्य विमीत दहिवले यांनी राबविला उपक्रम.
कोणत्याही समाजाचा पाया मजबूत करण्याच काम हे विचारवंत करत असतात. आजचा तरुण वर्ग हा काहीसा वाचन आणि लिखाणापासून दूर झालेला आहे. गावातील तरुणांना स्वत:चा व्यक्तिमत्व विकास साधता यावा.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस योग्य ति दिशा मिळावी. त्यांची विचार कण्याची क्षमता वाढावी या हेतूने प्रथमच मिनघरी गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य विमीत दहिवले यांनी गावस्तरिय निबंध स्पर्धेच आयोजन केले होते. स्पर्धेची सुरुवात संविधानाचे प्रास्ताविक वाचन करुण करण्यात आली.यामध्ये १८ वर्षाखालील एकुण १६ स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता..
प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
आम्रपाली बागेसर अध्यक्षा मायावती फॅन्स क्लब सिंदेवाही
द्वितीय पारितोषिक विमीत दहिवले सदस्य ग्रामपंचायत मिनघरी तर तृतिय पारितोषिक लखन नन्नावरे सदस्य ग्रामपंचायत मिनघरी यांचेकडून बक्षीश देण्यात आले. तर विजेत्या तिन्ही स्पर्धेकांना भारतीय संविधान ग्रंथ
क्षितीज मेश्राम नागपूर
भारतीय वायू सेना यांचेकडून
तसेच सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र ,या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक धम्मदिप अशोक खोब्रागडे द्वितीय क्रमांक कुणाल कैलास गुरनुलेआणि तृतिय क्रमांक विक्रांत विलास गुरनुले यांनी प्राप्त केला आहे.
या स्पर्धेच परिक्षण डॉ. कोर्तलवार सर ज्ञानेश महा.नवरगाव यांनी केला तर स्पर्धा यशस्वी कण्यासाठी हेमंत बन्सोड, वैशाली खोब्रागडे, प्रशिक खोब्रागडे., प्रशांत गेडाम, अमित गुरनुले, लिखित गुरनुले आणि आमचा गाव-आमचा विकास समिती मिनघरी या सर्वाच सहकार्य लाभले.अशा स्पर्धेतून उत्कृष्ट विद्यार्थी घडविता यावेत. म्हणुन असे विविध उपक्रम गावामध्ये राबवून विद्यार्थ्यांना पुढेही प्रोत्साहित करण्यासाठी आणखि विविध स्पर्धा राबविण्यात येतिल तेव्हा जास्तित जास्त युवकांनी सहभागी होऊन.आपला व्यक्तिमत्व विकास साधावा
असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य विमीत दहिवले यांनी केले आहे..
तर विजेत्या स्पर्धेकांचे
गावातून कौतूक होत आहे.