नरभक्षक वाघांना त्‍वरीत जेरबंद करावे अन्‍यथा निलंबनाच्‍या कारवाईला सामोरे जावे लागेल-वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

सावली,दि. १५/१२/२०२२
तालुक्यातील 7 किमी अंतरावर असणाऱ्या रुद्रापूर येथे काल दि. १४/१२/२०२२ ला एका शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतर आज ही सावली पासून 3 किमी अंतरावरील खेडी येथे शेतात कापूस काढत असताना वाघाने हल्ला करून स्वरूपा प्रशांत येलेटीवार (50) ला ठार केले आहे. सदर घटनेची माहिती वनविभाग सावलीला देण्यात आली आहे.
सावली तालुक्यात मनुष्यांवर प्राण्यांचे हल्ले होत असून प्रशासनाने त्वरित पावले उचलून येथील वाघ अन्यस्तरीय स्थलांतरित करण्याची मागणी परिसरातील जनतेकडून व वन्यप्रेमी कडून मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे. मागील आठवड्यात सामदा येथील वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या प्रकरणाची शाही वाढते न वाढते तोच दिनांक १४ डिसेंबर रोजी मुल तालुक्‍यातील कांतापेठ येथे देवराव सोपनकार,  व  सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सावली पासून 5 किमी अंतरावरील रुद्रापूर येथील शेतकरी बाबुराव बुद्धाजी कांबळे वय 65 वर्ष हे दैनंदिन प्रमाणे आपल्या शेतीकडे जाण्यासाठी निघाले असता वाटते दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्या वर हल्ला करीत त्यांच्या मानेला पकडून वाघ हा जंगल परिसरात घेऊन गेला. तर आज कापूस वेचण्यासाठी गेलेल्या खेडी येथील महिलेवर हल्ला करून ठार केले.
या घटनेने मात्र खळबळ माजली असून शेतकरी भयभीत झाले आहे,सतत होणारे वाघांचे हल्‍ले व नागरिकांचे जाणारे बळी ही चिंतेची बाब आहे. या वाघांना तातडीने जेरबंद करण्‍याची आवश्‍यकता आहे. याबाबत कोणतीही हयगय खपवून घेणार नाही, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. याबाबत त्‍यांनी वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी व सर्व संबंधित अधिका-यांना तातडीच्‍या कार्यवाहीचे निर्देश दिले आहे
ताडोबा मध्ये वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे , व्याघ्रदर्शनासाठी दिवसभर कितीतरी वाहने( जिप्सी ) जात असते ,त्यामुळे वाघांना त्रास होऊन जंगलातून बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही , अगोदर व्याघ्रदर्शन बंद करून जंगलाला तारेचे कुंपण करून घेतल्यास निश्चितच अश्या प्रकारामध्ये वाढ  होणार नाही —मंगेश पोटवार  शेतकरी चिमढा