श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
सिंदेवाही, दि. १५/१२/२०२२
शहरातील दुसरी घटना
आज सकाळी 7वाजेच्या दरम्यान मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या एका इसमावर ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर परिसरात अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले असून ही महिन्या भरातील दुसरी घटना आहे या मुळे सकाळी मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे
सदर हल्ल्यात जखमी असलेल्या नागरिकाचे नाव नंदकिशोर शेंडे वय 50 वर्ष असून ते सार्वजनिक बांधकाम विभाग येथे कार्यरत असून ते त्याच विभागाच्या क्वार्टर मध्ये राहत असल्याचे समजते.
नेहमी प्रमाणे शेंडे हे सकाळी आपल्या घरून ते रेल्वे स्टेशन रोड ने जिटीसी पर्यंत फिरायला जातात याच रस्त्याने सकाळी फिरायला जाणाऱयांची संख्या मोठी आहे मात्र आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास जिटीसी परिसरातून एक अस्वल आपल्या पिलांसह निघाली असता बेसावध असलेल्या नंदकिशोर शेंडे यांचेवर हल्ला चढविला यात त्यांच्या उजव्या डोळ्याला ,मानेला डोक्याला गंभीर मार लागला त्यांचेवर स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारा करिता चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. या आधी देखील वीज वितरण कंपनी च्या कार्यालयासमोर महिनाभराआधी एका इसमावर हल्ला करून जखमी केले होते महिना भरातील ही दुसरी घटना असून वनविभाग मात्र जनतेला मॉर्निंग वॉक ला जाणे बंद करण्याचे आवाहन करीत आहे मात्र त्या अस्वलाचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत असल्याची ओरड जनतेकडून होत आहे
या अस्वलाचा ताबडतोब बंदोबस्त करून जनतेवर होणाऱ्या हल्ल्यापासून सुटका करावी अशी मागणी जोर धरत आहे
येत्या 8 दिवसात सदर पिलांसह फिरणाऱ्या अस्वलाचा बंदोबस्त करण्यात आला नाही तर आम्हाला देखील कठोर पावले उचलावी लागतील व याची जबाबदारी वनविभागावर राहील
–अभिजित मुप्पीडवार
एक सुजाण नागरिक सामाजिक कार्यकर्ता सिंदेवाही