जाहिर निवेदन
सर्व आदिवासी समाज बांधव तसेच सर्व आदिवासी संघटना, सर्व राजकीय पक्षाचे आदिवासी आघाडी दल सर्व आदिवासी आजी-माजी आमदार व खासदार, सर्व आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य सर्व आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तसेच गोंडवाना नावाने असलेले राजकीय पक्ष व आदिवासी नावाने असलेले राजकीय पक्ष या सर्वांना जाहिर निवेदनाव्दारे आव्हान करण्यात येते की, दि. 21 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 11.00 वाजता यशवंत स्टेडीयम नागपूर येथून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर सर्व आदिवासींचा राज्यस्तरीय विराट महाआक्रोश मोर्चा हा बोगस आदिवासींच्या 12500 जागा रिक्त करून त्या जागा खऱ्या आदिवासी मधुन भरणे व महाराष्ट्र शासनाचे विविध विभागात रिक्त असलेल्या आदिवासींचा 70,000 पेक्षा अधिक बँकलाक विशेष भरती मोहिमेव्दारे भरून काढणे या प्रमुख मागणीसह इतर मागण्याबाबत आयोजित केलेला आहे.
हा मोर्चा न भुतो न भविष्य असा 5 लाखापेक्षा अधिक लोकांच्या सहभागाने पूर्ण करावयाचा आहे त्यासाठी आपआपल्या तालुका व जिल्हास्तरावर अस्तित्वास असलेल्या सर्व आदिवासी संघटना व लोकप्रतिनिधी यांच्या सभा 7 दिवसात घेवुन मोर्च्यामध्ये येणारे लोकांना व्यवस्था करण्यासाठी आर्थिक निधी गोळा करणे, वाहणे, बॅनर-पोस्टर तयार करण्याचे नियोजन करावे तसेच आपल्या जिल्हास्तरावरील मागण्यांचे निवेदन तयार करावे असे जाहिर निवेदनाव्दारे आव्हान करण्यात येत आहे. हि माहिती जास्तीत जास्त समाजबांधवांना मिळावी आणि पोहचवावी. असे आव्हान कविता मडावी राजुरा यांनी केले आहे