मूल येथे बस ट्रकच्या अपघातात वडसा तालुक्यातील युवतीचा मृत्यू, तर 5 किरकोळ जखमी

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

मूल,दि.२९/१२/२०२२

मूल शहरापासून  दोन किमी अंतरावर मुल- चंद्रपूर मार्गावर डोनी फाट्याजवळ ट्रक-बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. ही घटना आज दुपारी दोन वाजता चे सुमारास घडली. यात बस मध्ये मागच्या सीटवर बसलेली मुलगी जागीच ठार झाली असून काही प्रवाशी किरकोळ जखमी आहे.

तर ट्रक चालक घटना स्थळावरून ट्रक ठेऊन फरार झाला. तेजस्विनी नारायण कोडवते वय (२४) वर्ष असे मृत युवतीचे नाव असून ती एकलपुर तालुका वडसा जिल्हा गडचिरोली येथील रहिवाशी आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे. Truck & Bus accident  near mul , one death & 5 injured