गर्भवती महिलेची आत्महत्या

गडचिरोली प्रतिनिधी

गडचिरोली,दि.०३/०१/२०२३

गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावरील कॅनरा बॅकेत कार्यरत  बँक कर्मचारी सचिन लक्ष्मण बिसेन यांच्या गर्भवती पत्नीने त्यांच्या किरायाच्या घरात गळफास घेवून आत्महत्या ‘केल्याची घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरातील आशीर्वाद नगरात व घडली. छोटी सचिन बिसेन ( 24 ) असे मृतक गर्भवती महिलेचे नाव आहे.

बँक कर्मचारी सचिन लक्ष्मण बिसेन हा चामोर्शी मार्गावरील कॅनरा बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत आहे: तो आपली गर्भवती पत्नी व चार वर्षीय मुलासह बॅकेच्या मागील बाजूस भडके यांच्या घरी किरायाने राहत आहे . दरम्यान, रविवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास गर्भवती महिलेने आपल्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तत्काल घटनास्थल गाठून पंचनामा केला. कौटुंबिक वादातून महिलेने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास गडचिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सहारे करीत आहेत.