चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी,दि.०६/०१/२०२३
गेल्या काही महिन्यांपासून या तालुक्यात वाघाच्या, बिबट्याच्या हल्ल्यात अनेक घडल्या असतानाच ५ जानेवारी रोजी रामाळा येथील पोचुजी जिगरवार यांच्या गोठ्यात असलेल्या बोकडावर बिबट्याने हल्ला करून पाच बोकड ठार केले तर तीन बोकड जखमी केल्याची घटना चामोर्शी वनपरिक्षेत्रात घडली त्यामुळे नागरिकात दहशत पसरली आहे
चामोर्शी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मौजा रामाळा येथे दि.०५/०१/२०२३ रोजी रात्रोच्या वेळी पोचूजी मल्ला जिगरवार यांच्या गोठ्यात बांधून असलेल्या १७ मेंढ्यावर हल्ला करून ०५ बोकडांना ठार केले व ०३ बोकडांना जखमी केल्याची घटना घडलेली आहे. सकाळी वन विभागाचे वनाधिका-यांनी मोकास्थळी जाऊन सदर घटनेचा पंचनामा केला.सदर घटनेमुळे पोचू मल्ला जिगरवार यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली असून शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली.
या घटनेचा पुढील तपास मा.राहुलसिंह टोलीया ,उपवनसंरक्षक वनविभाग आलापल्ली, श्री.प्रदिप बुधनवर प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी, आलापल्ली यांचे मार्गदर्शनाखाली श्री.आर.बी.इंनवाते वनपरिक्षेत्र अधिकारी,चामोर्शी यांच्या नेतृत्वात श्री.ए.व्ही.लिंगमवार क्षेत्र सहाय्यक, चामोर्शी, श्री.आनंद साखरे वनरक्षक व विठ्ठल मेश्राम वनरक्षक इत्यादी कर्मचारी करीत आहेत. Leopard kill goat at ramala
वन विभागाचे अधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांनी या भागात वाघ व बिबट्याचे अस्तित्व दिसून येत असून परिसरातील नागरिकांनी रात्रोच्या वेळेस विनाकारण फिरणे टाळावे तसेच शेतावर जाताना सतर्कता बाळगावी असे आवाहन नागरिकांना केले.