अहेरी तालुक्यात येत असलेल्या काफेवंचा या गावालगत असलेल्या जंगल परीसरात वनकर्मचारी रस्त्याचे मोजमाप करीत असताना अचानक नक्षल घटनास्थळी दाखल होवून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह सहा वनकर्मचाऱ्याला बेदम मारहाण करीत वनकर्मचाऱ्यांची दुचाकीला जाळपोळ करून मोबाईल घेवून धमकावून गेल्याची घटना दि.०५/०१/२०२३ च्या सायंकाळी ४.०० वाजताच्या सुमरास घडली आहे.
सिरोंचा वनविभागात येत असलेल्या कमलापुर वनपरिक्षेत्रातील कोळसेपल्ली रोड चे नविन बांधकाम सुरू करण्यात आले आहे.. सदर रस्त्याचे बांधकाम कंत्राटद्वारा मार्फत सुरू करण्यात येणार होते. त्याच कामाची पाहणीसाठी कामलापुर चे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोयर, सर्वेयर गणेश रेपलवार, वनपाल एस. एम. डलावार, राजू मेडलवार, वनरक्षक प्रमोद तोडासे, हेमंत बोबाटे, राधा मडावी गेले होते याच दरम्यान नक्षल घटनास्थळी दाखल झाले आणि रस्त्यांच्या बांधकामाला विरोध दर्शवून यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास सहा जणांना मारझोड केली असून महिला वनरक्षक यांना फक्त धमकावून चार दुचाकीची जाळपोळ करीत वनकर्मचाऱ्यांचे मोबाईल हस्तगत करून वनामध्ये येण्यास वन कर्मचाऱ्याला मज्जाव केले आहे. याशिवाय स्थानिक अतिक्रमण धारकांवर केलेली करवाई मागे घ्यावी, तसेच नव निर्माण रस्त्याला विरोध करीत नक्षल जंगलाच्या दिशेने निघुन गेले.