श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
धर्मगुरू महान तपस्वी संत डॉ. रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशन भारत तर्फे राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कार सुदामभाऊ राठोड यांना महंत शेखर बापू पोहरादेवी यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले,सुदामभाऊ राठोड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या मार्फत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर व विविध माध्यमातून गोरगरिबांना मदत कशी करता येईल तशी मदत केली व आज १३ वर्षांपासून अहोरात्र “जन सेवा हीच ईश्वर सेवा” म्हणून निरंतर काम करणारा विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातून जिवती तालुक्यातील पेदाआसापुर या गावातील निस्वार्थ पणे गोरगरिबांच्या हक्कासाठी लढणारा एकमेव सामाजिक कार्यकर्ता सुदामभाऊ राठोड यांच्या कार्याची दखल घेऊन बंजारा तिर्थकाशी पोहरादेवी येथे राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.