सावरगाव येथे गोठ्यात घुसून बैलावर वाघ चा हमला

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

सावरगाव,दि. १७/०१/२०२३  

तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत तळोदी बीटातील सावरगाव येथील शेतकरी वासुदेवजी निकुरे यांच्या घरी असलेल्या गुरांच्या गोठ्यात घुसून रात्र बारा वाजता वाघाने हमला करून बैलाला गंभीर जखमी केले. यावेळेस बैलाचा ओरडण्याचा आवाज ऐकल्याने घरातील सदस्य उठून गोट्याकडे जाऊन जोरजोराने टीना वाजवल्यामुळे हमला करणारा प्राणी निघून गेला. या घटनेची माहिती वनरक्षक एस .बी. पेंदाम यांना व स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांना देण्यात आली. त्यावेळी तात्काळ संस्थेचे सदस्य व पी.आर.टी.चे सदस्य घटनास्थळी जाऊन परिसरात गस्त केली व फटाके फोडून हमला करणाऱ्या प्राण्याला दूर हाकलण्यात आले. मात्र यामध्ये जखमी झालेल्या बैलाच्या मानेलावर व गळ्याला गंभीर जखमा असून, हमला करणारा प्राणी नक्की वाघ की बिबट हे कळू शकले नाही .
मात्र अशा प्रकारे सावरगाव च्या इतिहासात पहिल्यांदाच गावात येऊन घर परिसरात घुसून पाळीव प्राण्यांवर हमला झाल्यामुळे परिसरात भीती निर्माण झालेली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी गावातील एका महिलेला शेतात वाघाने हमला करून ठार केले होते. आणि त्यानंतर लगातार गावामध्ये बिबट्यांची जोडी येऊन पाळीव शेळ्या कोंबड्यांवर हल्ले करून त्यांना ठार मारत आहे.
“गाव परिसरात रानटी डुकरे यांच्या मागावर येऊन वाघ, बिबट यांचे शेती,गाव परिसरात वास्तव असल्यामुळे कोणतेही अनुचित प्रकार घडून मानव हानी होऊ नये याकरिता गावातील लोकांनी रात्री फिरताना किंवा घराबाहेर निघताना लाईट लावूनच किंवा हातात टार्च घेऊनच निघावे व गावाबाहेर शौचास जाऊ नये ,सावधानता बाळगावी.” अशी विनंती स्वाब संस्थेच्या वतीने गावातील लोकांना केली आहे. यावेळी रात्री बारा ते दोन वाजेपर्यंत स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, संस्थेचे सदस्य व पि.आर.टी. चे सदस्य महेश बोरकर, , प्रशांत सहारे, हितेश मुंगमोडे, प्रवीण बोरकर, प्रतिकार बोरकर, सदस्य यांनी परिसरात रात्री पहाटे पर्यंत गस्त केली.
सकाळी वनरक्षक एस.बी. पेंदाम यांनी घटनास्थळी मोका पंचनामा केला.