डाक खात्यातील कर्मचार्याचा एक दिवसीय लाक्षणिक संप

चामोर्शी:- डाक खात्यातील विविध प्रकारच्या प्रलंबित मांगण्याच्या विरोधात NEFT चंद्रपूर शाखेच्या वतीने पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक संपात चामोर्शी उपविभागातील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने संप १०० टक्के यशस्वी झाला
डाक खात्यातील टपाल खात्याचे खाजगीकरण तुरंत थांबवा, जुनी पेन्शन योजना चालू करा, कमलेश चंद्र कमिटीच्या उर्वरित शिफारसी लागू करा, टपाल खात्यात पाच दिवसाचा आठवडा लागू करा, महागाई भत्त्याची उर्वरित थकबाकी वाटप करा आदी प्रमुख मागण्यासाठी आज १० आगाष्ट रोजी उपविभागातील चामोर्शी येथील एस.ओ. श्री.श्रीकांत दुपारे ,श्री. हितेश श्री.कोहल, श्री.उमेश चौधरी, श्री.मारोती दुधबावरे, घोट एस. ओ, श्री.एम. जी. बट्टे, आष्टी एस. ओ. श्री.पी. कविरंजन, मुलचरा एस. ओ. श्री.आर. ठाकरे,
चामोर्शी उपविभागातीलश्री. लोमेश जुंनघरे, श्री.रमेश उडान आदी कर्मचारी संपात सहभागी झाल्याने संप १०० टक्के यशस्वी करण्यात आला.