चामोर्शी :- स्वातंत्र्याच्या अम्रुत महोत्सव निमित्य दि ८ आॅगस्ट २२ रोज सोमवारला स्थानिक जा. क्रु. बोमनवार माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात पोलीस स्टेशन चामोर्शी द्वारा सायबर गुन्हे, अंमलीपदार्थाचे दुष्परिणाम, या विषयी मार्गदर्शन शिबीर पार पडले.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य- इतेंद्र चांदेकर, प्रमुख मार्गदर्शक- मा. विपीन शेवाळे साहेब ,पोलीस निरीक्षक, प्रमुख अतिथी म्हणून – श्री- भिवनकर मेजर आदि उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक मा. – विपीन शेवाळे साहेब ,पोलीस निरीक्षक यांनी विदयार्थ्यांना हर घर झेंडा, सायबर गुन्हे, अंमलीपदार्थाचे दुष्परिणाम मोबाईल चा वापर करतांना घ्यावयाची काळजी, शिक्षणाचे महत्त्व, पोस्को कायदा, लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार, लैंगिक अत्याचार होऊ नये म्हणून विदयार्थ्यांनी घ्यावयाची काळजी व स्वत: चा बचाव कसा करावा. अशा अनेक विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. अतिथींनी विदयार्थ्यांना सुरक्षित राहण्यासाठी आणि इतर गैरमार्गापासुन सुरक्षा करण्याविषयी अनेक पोलीस कलमाचा परिचय करून दिला. चालू वाहणावर मोबाईल चा वापर करू नका असे सांगितले.
अध्यक्षस्थानी पोलीस अधिका-यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा सर्व विदयार्थ्यांनी लाभ घ्यावा. विदयार्थ्यांनी स्वतः चे संरक्षण करावे व अभ्यासाकडे अधिक लक्ष देऊन यश मिळवावे असे प्रतिपादन केले.
संचालन स. शि. संतोष चावरे तर आभार प्रदर्शन- स. शि. घनश्याम मनबतुलवार यांनी केले.
याप्रसंगी पोलीस विभागाचे कर्मचारी, शिक्षक – शिक्षिका विदयार्थी शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.