प्रेसनोट
आज 9 आगस्ट आदिवासी एकता युवा मंच च्या वतीने गडचिरोली येथील चामोर्शी रोड वरील भगवान बिरसा मुंडा चौकात जागतिक मुळनिवासी ( आदिवासी ) दिवस मोठ्या हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला. यावेळेस वरून राजा ने ही जोरदार सरी बरसवुन आदिवासी समाज बांधवांचा आनंद द्विगुनीत करण्यात मदत केली.
कार्यक्रमाची सुरवात आदिवासी सेवक घनश्यामजी मडावी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन केली. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संजय ऊईके, सचिव प्रदिप कुलसंगे, आदिवासी सेवक कुसुम अलाम, भरत येरमे, माधव गावळ, वर्षा शेडमाके आदि प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळस न्युज पोर्टज जागर चा शुभारंभ जि. प. गडचिरोली चे उपमुख्य कार्यपालन अधिकारी फरेन्द्र कुतिरकर सर यांचे हस्ते करण्यात आले.
शुभारंभ प्रसंगी जागर न्युज पोर्टलचे सह संपादक उमेश ऊईके, साहित्यिक कुसुम अलाम, भरत येरमे, माधव गावळ उपस्थित होते. यावेळेस सर्व सगा समाज बांधव मिळून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात भगवान बिरसा मुंडा चौकातुन सुरु होऊन इंदिरा गांधी चौक ते बस स्टाप ते कै. बाबुराव मडावी चौका पर्यत काढण्यात आली. या ठिकाणी मा. घनश्याम मडावी, नगरसेवक गुलाब मडावी, भरत येरमे यांच्या हस्ते कै. बाबुराव मडावी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या भव्य रॅलीत समस्त समाज बांधव हातात पिवळे झेंडे, सप्तरंगी झेंडे व पिवळे फेटे बांधून मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅलीत वीर बाबुराव शेडमाके…अमर रहे, भगवान बिरसा मुंडा अमर रहे, सेवा सेवा… जय सेवा, जागतिक आदिवासी दिन चिरायु होवो. एक तिर, एक कमान. सारे आदिवासी एक समान. या नारे व घोषणा देत होते. या भव्य रॅली मध्ये संघटनेचे अध्यक्ष संजय ऊईके, सचिव प्रदिप कुलसंगे, उपाध्यक्ष माणिक गेडाम, सहसचिव सुधिर मसराम, कोषाध्यक्ष मंगेश नैताम, संघटक संजय मसराम, सदस्य उमेशभाऊ ऊईके, प्रफुल्ल कोडापे, आकाश कोडापे, गिरीष ऊईके, सुरेश चिकराम, वासुदेव कोडापे , प्रशांत मडावी, हेमाताई कुलसंगे, सारिका ऊईके, माही ऊईके, पिहु ऊईके, तृष्णा सिडाम, रिध्दिमा कुलसंगे, देवयानी ऊईके, माही ऊईके, संजय चिकराम, साहिल आत्राम, माणिक मडावि, तुषार मसराम, देवाजी कोडापे, अनुष्का कुलसंगे, रेखाताई कोडापे, सीमा कोडापे, लक्ष कोडापे, तक्ष कोडापे, साई ऊईके, चंद्रकला ऊईके. आदि समाज बांधव उपस्थित होते. टेकाम, प्रणाली टेकाम उपस्थित होते.