श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज,दि.२०/०१/२०२३
देसाईगंज शहराच्या सर्व्हे नं. २२\८० येथील व्यावसायिक गाळ्यांसाठी ०.३६ हे.आर.जागेत नगर विकास ६ (३) योजने अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांच्या व्यावसायिक प्रयोजनार्थ गाळ्यांचे बांधकाम करुन सुशिक्षित बेरोजगारांना अटी व शर्थिच्या अधिन राहुन भाडेतत्वावर गाळे देण्यासाठी तब्बल १७० च्या वर गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले.माञ नगर परिषदेशी करण्यात आलेल्या करारनाम्यातील अटी व शर्थीला हरताळ फासुन दुकान दुसरीकडे तर गोडाऊन नगर परिषदेच्या शाॅपिंग काॅम्पलेक्स मध्ये करण्यात आले आहेत. shopping complex desaiganj
नियमानुसार एका व्यक्तीला एकच गाळा भाडेतत्वावर देणे बंधनकारक असताना एका व्यक्तीला एक पेक्षा जास्त गाळे देण्यात आले असुन सदर दुकानदारांनी गाळ्यांची तोडफोड करुन अटी व शर्थीचे उल्लंघन केले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जवळपास ५० सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगारावर पाणी फेरल्या गेले असल्याने गाळा दुस-याच्या नावे तर वहिवाट भलत्याचीच असल्याचे एकंदरीत स्थितीवरुन दिसुन येत आहे.
तरी सदर प्रकरणाची योग्य चौकशी करावी आणि सध्या स्थितीत बंद असलेले गाळे सुशिक्षीत बेरोजगार युवकांना वाटप करण्यात यावे अशी मागणी आज तालुका समाजवादी पार्टी देसाईगंज च्या वतीने निवेदनाद्वारे देसाईगंज नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांन कडे करण्यात आली, अन्यथा समाजवादी पार्टी देसाईगंज तालुका तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही निवेदनातुन देण्यात आला. otherwise smajwadi party desiganj will be fight for this
सदर निवेदन देतांना समाजवादी पक्षाचे गडचिरोली जिल्हा कोषाध्यक्ष जीब्राइल शेख,देसाईगंज तालुका महासचिव प्रितम जणबंधू,विजय लांडगे,विजय राऊत आणि सपा कार्यकर्ते आणि पदाधिकारि उपस्थित होते,