चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी,दि.२३/०१/२०२३
विविध स्पर्धांची रेलचेल सह स्नेहमिलन सोहळा
चामोर्शी येथील गानली समाज लक्ष्मी महिला ग्रुप च्या वतीने २२ जानेवारी रोजी विविध स्पर्धा घेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम विश्रामगृहाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला
लक्ष्मी प्रतिमेचे पूजन करत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासह स्पर्धांना सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम “वण मिनिट” गेम शो मध्ये सर्वच महिलांनी सहभाग घेतला त्यात पिंकी बोमनंवार, वैशाली चन्नावार, कुंदा कामीडवार, नम्रता बोमनवार, भारती पुठ्ठवार, मयुरी पोरेड्डीवार, यांनी बाजी मारली तर “लकी लेडी” या स्पर्धेत प्रतिभा पोटवार या विजयी झाल्या त्यानां ज्येष्ठ महिलांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. त्यानंतर सर्व महिलांना हळदी कुंकू , वान देऊन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला
लक्ष्मी महिला ग्रुपच्या गीता वडेट्टीवार, कविता पोटवार, वर्षा टेपलवार,नेत्रा वडेट्टीवार, इंदिरा पोरेड्डीवार ,भारती पुट्ठावार, मनीषा संतोषवार, स्मिता सिग्रेड्डीवार, विद्या कोतपल्लीवार, कुंदा कमीडवार , व सविता कोतपल्लीवार आदी ग्रुपच्या महीलाचे सहकार्य लाभले.