पूर परिस्थिती च्या अनुषंगाने जनतेला सतर्कता बाळगण्याचे आव्हान- जिल्हाधिकारी गडचिरोली

भारतीय हवामान विभागाने पुढील 48 तासा करिता गडचिरोली जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट दिलेला आहे त्या अनुषंगाने गोसिखुर्द प्रकल्पच्या पानलोट क्षेत्राच्या नागपूर,भंडारा, गोंदिया जिल्यामधून होणाऱ्या पाण्याच्या अधिक विसर्गामुळे गोसेखुर्द धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गा मध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता वैनगंगा तसेच प्राणहिता गोदावरी या नद्याच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती उद्भवण्याची श्यक्यता असल्या मुळे गडचिरोली जिल्ह्यातील नदी किनारी असणाऱ्या संबंधित गावांना उचित सतर्कता बाळगन्याचे आव्हान जिल्हाधिकारी यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालया द्वारे केली आहे.

सध्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी सहित अन्य जिल्यातून येणाऱ्या वर्धा,प्राणीहीता,गोदावरी व इंद्रावती नदीच्या पाण्याची वाळती पातळी लक्षात घेता संबंधित सर्व तहसीलदार विशेषता देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, भामरागड, अहेरी व सिरोंचा यांनी संभाव्य पूर बाधित भागात वेळो वेळी यंत्रने मार्फत दवंडी द्यावी तसेच प्राप्त परिस्थिती चा विचार करून विविध विभागाच्या समन्वयातून आवश्यकता पडल्यास तात्काळ सदर पूर बाधित परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करावी.

नदी किनारी गावातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी. तसेच नदी/नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही पूल ओलांडून नये असे जिल्हा प्रशासनाकडून आव्हान करण्यात आले आहे.