निवासी घराच्या जागेचे कायमस्वरूपी पट्टे द्या-मनसे मूल तालुका 

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

मुल,दि.०९/०२/२०२३

पंधरा दिवसाचे आत मागणी पूर्ण नाहि झाल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन

मुल शहर निवासी मागील तीस वर्षापासुन मुल शहरात वास्तव्यास असुन आम्हाला स्वताचे निवासाकरीता जागा नाहि तेव्हा आम्ही आपआपल्या परीने जागा संपादित करून मागील तीस वर्षापासून वास्तव्य करीत आहोत परंतु आम्हाला स्वतःच्या निवासासाठी हक्काची जागा नाहि तेव्हा आपण आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून आम्हाला मालकि हक्काचे निवासी पट्टे देन्यात यावे या आशयाचे निवेदन मनसेचे चंद्रपूर जिल्हासचिव (बल्लारपूर विधाणसभा)श्री.किशोरभाऊ मडगुलवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तहसीलदार साहेब मुल तसेच मुख्याधिकारी साहेब नगरपरीषद मुल यांना देन्यात आले तसेच निवेदन या आधि दिनांक ३१/०१/२०२२ ला या संबधीत निवेदन आपल्या कार्यालयाला दिले होते मात्र आज एक वर्ष लोटूनहि आपल्या स्तरावर कोणतीहि दखल घेतली गेली नाहि मात्र सदर निवेदनाची १५ दिवसाचे आत दखल न घेतल्यास आणि येथील नागरीकांना न्याय न मिळाल्यास मनसे शैलीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराहि यावेळेस देन्यात आला निवेदन देतांना मुल तालूका अध्यक्ष स्नेहल झाडे, प्रविण गूरूनूले, प्रविण भरतकर, महेश वैरागडवार, विनोद पेंदोर, अक्षय वाकडे, तसेच मुलचे पदाधिकारी व मनसैनिक उपस्थीत होते. newsjagar