चामोर्शी : – शहीद बाबुराव शेडमाके विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय आमगाव महाल च्या वतीने स्वतंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवा निमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करून ‘ एकच नारा, एकच नारा // हर घर झेंडा, घर -घर तिरंगा ‘ बाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध घोषवाक्य देऊन गावात रॅली फिरवून प्रत्येक घरी प्रत्येकाने आपला देशाभिमान जागृत करून घर घर तिरंगा या भारत सरकारच्या अमृत महोत्सवात प्रत्येकाने आपला सहभाग द्यावा व भारतमातेचे नाव लौकिक करावे यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले यासाठी शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक प्रकाश निमकर , सुनील वांढरे, पुरुषोत्तम गुरुनुले, सुवेंदु मंडल , गजानन बारसागडे, चंदू सातपुते, अनिल निमजे, रुचिता बंडावर, कविता पुण्यपकर आदींनी मुलांना मार्गदर्शन व सहकार्य केले तसेच शालेय विद्यार्थ्यांना आपल्या घरी 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वज फडकवण्याबाबत व नियमावली विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यासाठी तिरुपती बैरवार व रतन सिकदर यांनी मोलाचे सहकार्य केले.