गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
20 फेब्रुवारी
नक्षल्यांनी जवानांवर केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाल्याची घटना छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील बोरतालाब ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर नक्षल्यांनी जवानांच्या दुचाकीही पेटवून दिल्या व पसार झाल्याची माहिती आहे. कॉन्स्टेबल राजेश प्रतापसिंह आणि कॉन्स्टेबल ललित यादव असे शहीद जवानांचे नाव आहेत. naxal attack
प्राप्त माहितीनुसार, मोबाईल चेक पोस्टवर जवान तैनात होते, दरम्यान अचानकपणे जंगलाच्या बाजूने नक्षली आले व गोळीबार सुरु केला. यादरम्यान जवानांना प्रत्युत्तर देण्याची कोणतीही संधीही मिळाली नाही त्यामुळे दोन जवानांचा घटनास्थळी मृत्यू झाला. शहीद जवान ललित सम्राट सीएएफमध्ये तैनात होते, ते दंतेवाडा जिल्ह्यातील रहिवासी होते. तर राजेश जिल्हा दलात तैनात होते.
सदर घटनेनंतर नक्षल्यांनी जवानांच्या दुचाकीही पेटवून दिल्या व पसार झाले. सदर घटनेनंतर छत्तीसगड – महाराष्ट्र सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. newsjagar