मुलींच्या वस्तीगृहात धुळघुस करणाऱ्या अखिलवर विविध गुन्हे दाखल

A case has been filed under various sections
A case has been filed under various sections

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

गोंडपिपरी,दि.२६/०२/२०२३

दि. १९/०२/२०२३ला गोंडपिपरी येथील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात दारूच्या नशेत रात्रीच्या वेळेस अंदाजे आठ वाजताच्या सुमारास मुलींच्या वस्तीगृहात शिरून घाणेरड्या ,अश्लील शब्दात मुलींना धमकावुन बळजबरी करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या अखिल ताडशेट्टीवार akhil tadshettiwar यांचेवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल.newsjagar 

सदर प्रकारामुळे वस्तीगृहातील मुली घाबरलेल्या असून, शैक्षणिक क्षेत्राच्या वर्तुळात अत्यंत निर्दयी व घृणास्पद घटना आहे. A case has been filed under various sections on akhil tadshettiwar

वसतिगृहाच्या अधीक्षिका लता थिपे (खामनकर) यांनी गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारी नुसार गैर अर्जदार अखिल ताडशेट्टीवार याच्यावर फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करून जमानीतीवरसोडलेले  होते. पण पत्रकार व सामाजिक कार्यकर्तयांनी गोंडपिपरी येथील वस्तीगृहात जाऊन शहानिशा केली असता दखलपात्र असल्याचे निदर्शनास आले. याचा पाठपुरावा करून विविध माध्यमातून बातम्या प्रकाशित करून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांना यासंदर्भात ची माहिती होतास त्यांनी तत्काळ सूत्रे हलवून मुलचे एसडीपीओ यांना चौकशीचे आदेश देऊन या प्रकरणात संबंधित आरोपीवर भारतीय दंड संहिता 1860 नुसार 354, 354A, 448, बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम नुसार 12, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती नुसार 3 (1) w (1), 3(1)w, 3 (1) (vo) अशा विविध कलमाखाली गोंडपिपरी पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पुढील तपास एसडीपीओ त्यांच्या नेतृत्वात सुरू आहे.