चामोर्शी : – भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने देश स्वातं>याचा अमृत महोत्व स साजरा करत आहे . पंचायत समिती चामोर्शी केंद्र आमगाव ( म) अंतर्गत येणाऱ्या शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय आमगाव महाल येथे ज्येष्ठ शिक्षक प्रकाश निमकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
घर- घर तिरंगा फडकविण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर
प्राचार्य अनिल गांगरेड्डीवार यांनी भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त तीन दिवस चालणाऱ्या ध्वजारोहण नाचा मान स्वतःच न घेता आपल्या शाळेतील सेवा जेष्ठ शिक्षक प्रकाश निमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा आग्रह धरला याप्रसंगी शाळेचे शिक्षक सुनील वांढरे, पुरुषोत्तम गुरुनुले ,सुवेंदु मंडल, नरेंद्र चिटमलवार, अनिल निमजे, किशोर पोहनकर, चंदू सातपुते ,सुरेश केळझरकर, रुचिता बंडावार ,कविता पुण्यपकर ,निशा रामगुंडे, श्रुती मोतकुरवार तसेच लीलाधर दुधबळे, तिरुपती बहिरवार, रतन सिकदर, सुरज मुनगेलवार आधी उपस्थित होते .
यावेळी सूत्रसंचालन नरेंद्र चिटमलवार यांनी केले. मानवंदना गजानन बारसागडे यांनी दिली सर आभार प्रदर्शन चंदू सातपुते यांनी केले.