स्टेट बँकेचा भोंगळ कारभार

श्री. प्रदीप वाळके मुख्यसंपादक,न्यूज जागर 

मूल,दि.२०/०३/२०२३

लोकांच्या आर्थिक सेवेसाठी बँकेची स्थापना होत असून बँकेने कितीही चांगली शुशोभित इमारत बनविली तरीही तिची विश्वासाहर्ता ,कार्यक्षमता तेथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आहे .
मूल येथील एस बि आय हि दिवसेंदिवस स्लो बँक ऑफ इंडिया होताना दिसत आहे , प्रत्येक कामासाठी वेळ लागत असून, लोकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे ,newsjagar
मूल येथील बँकेच्या ग्राहकाने १३/०३/२०२३ ला १ चेक जमा केला, चेक बाउंस झाला , १६/०३/२०२३ ला तो चेक परत घेण्याकरिता गेले असता वैभव सराओगी या बँक कर्मचाऱ्याने त्यांना अगोदर दुसऱ्या टेबलवर पाठविले , त्या टेबल वरून पुन्हा वैभव सराओगी च्या टेबलवर पाठविण्यात आले , नंतर त्यांनी रिटर्न आलेला चेक दिला, सोबत रिटर्न मेमो रिपोर्ट प्रिंटकरून दिले , त्यावर शिक्क्यासाठी तिसऱ्या टेबलवर जावे लागले.तिथे त्या मॅडम नव्हत्या १० मिनिट बसावे लागले , विनाकारण ग्राहकांना इकडे तिकडे पाठविण्यात येते.

१९/३/२०२३ ला ग्राहकाने नेटबँकिंग वरून व्यवहार केला असता सर्व प्रोसेस नीट होऊन हि पैसे ट्रान्सफर झाले नाही असे ४ दा झाले , २०/०३/२०२३ ला ग्राहक नागपूरच्या मनीष नगर ब्रान्चमध्ये चेक ने पॆसे काढायला गेले असता तिथे समजले कि मूल च्या ब्रांच ने अकॉउंट होल्ड करून ठेवले,तेव्हा मूल ब्रांच ला फोन वर विचारले असता त्यांना त्यांच्या रिटर्न मेमो रिपोर्ट च्या रिसिप्ट वर सही पाहिजे होती, ती सही सुटली म्हणून वैभव सराओगी या बँक कर्मचाऱ्याने चक्क अकाउंटंच होल्ड वर ठेवले, अश्या परिस्थितीत बँक कर्मचाऱ्याने डाटाबेस मधून मोबाइल नंबर काढून संपर्क साधन्यापेक्षाही अकॉउंट होल्ड करणे त्यांना जास्त सोयीचे वाटले.
या बँक कर्मचाऱ्याची कार्यक्षमता आणि बुद्धिमत्ता याची प्रचिती बऱ्याच ग्राहकांना येत असून बँकेच्या अश्या भोंगळ कारभारामुळे एस बि आय  ला आता स्लो बँक ऑफ इंडिया हे नवीन नाव लोकांच्या तोंडी येत आहे

वैभव सराओगी या बँक कर्मचाऱ्याशी फोन वर संपर्क साधला असता सही सुटल्यामुळे अकाउंट होल्ड वर टाकल्याचे सांगितले ,व लगेच सुरु करून देतो असेही सांगितले पण अजूनही बातमी लिहीपर्यंत होल्ड जशास तसाच होता.