गडचिरोली,दि. २१/०३/२०२३
गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत खासगी प्रवासी ट्रॅव्हल्स युनियन ने महिलांसाठी तिकीट केली ५०%
महाराष्ट्र सरकारने नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पत महिलासाठी ५०% एसटी महामंडळ च्या बसेस च्या तिकीट मध्ये ५०% सूट देण्याची घोषणा केली होती. आणि त्याची अंमलबजावनी पण सुरु झालेली आहे. त्याच घोषनेचा धागा पकडत चंद्रपूर- गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशन ने ट्रॅव्हल्स ने प्रवास करणाऱ्या महिलांकरिता तिकिटमध्ये ५०% टक्के विशेष सूट देण्याची घोषणा केली.Newsjaga
चंद्रपूर गडचिरोली ट्रॅव्हल असोसिएशन च्या सदस्यांनी तात्काळ मीटिंग घेत महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला प्रतिसाद देत ट्रॅव्हल्स ने रोज हजारोच्या पटीत प्रवास करणाऱ्या महिलासाठी ५०% तिकिटमध्ये सूट देण्याची घोषणा करून त्याची अंमलबजावनी उद्यापासून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्त साधत करण्याचे ट्रॅव्हल्स असोसिएशन च्या पधादिकाऱ्यांनी जाहीर केले.
चंद्रपूर- -गडचिरोली ट्रॅव्हल असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आणि महिलांच्या आर्थिक तडजोडीला हातभार लावत ,सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत ,आम्हीसुद्धा सामाजिक भान ठेवतो असे दाखवून दिले आहे, त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, विशेषतः महिला वर्गात त्यांच्या या निर्णयाची चर्चा होत आहे.