शहरातील रस्तावरील अतिक्रमणनामुळे वाहतुकीस अडथळा
वाहन धारक त्रस्त, नगर प्रशासनानी दखल घ्यावी
श्री. अमित साखरे , उपसंपादक न्यूज जागर
चामोर्शी
शहरातील अरुंद रस्ते असताना त्या रस्त्यावर विविध प्रकारचे अतिक्रण होत असल्याने त्या मार्गाने जाताना वाहनधारकांना मोठी दमछाक होत आहे याकडे नगर प्रशासन लक्ष देईल का ? असा प्रश्न वाहन धारकाकडून उपस्थित केला जात आहे
शहरात १७ प्रभाग असून काही प्रभाग मधील रस्ते अरुंद आहेत , सध्या शहरातील वाळवंटी चौकातून कुंभार मोहल्यकडे, कुंभार मोहल्याकडून गोंड मोहल्ला, ढीवर मोहल्ला यांच्या घराकडे जाणारा रस्ता, आंबेडकर वार्ड कडे जाणारा रस्ता, मार्कंड मोहल्ला, तेलंग मोहल्ला, प्रभाग क्रमांक १७ मधील वासेकर ते प्रमोद येडलावार यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यासह इतर लहान सहान रस्त्यावर वाहने, बैलबंडी, ठेवत असल्याने त्या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे यासाठी रस्त्यावर वाहने आदी इतर साधने राहणार नाही याची दखल घेण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा यासाठी वाहन धारक मागणी करत असून या गंभीर समस्याकडे तत्काळ लक्ष देऊन रस्त्यावर वाहने व इतर अतिक्रमण होणार नाही याची दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.