न्युज जागर,वृत्तसेवा
नागपूर,दि.२४/०३/२०२३
लोकसभा सचिवालयाने आज राहुल गांधी यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द करणारी अधिसूचना जारी केली.गुरुवारी (23 मार्च) सुरत न्यायालयाने त्यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षांचा कारावास आणि 15,000 रुपये दंड ठोठावला.canceling Rahul Gandhi’s membership in Parliament.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. केरळमधील वायनाड येथून ते खासदार आहेत. एक दिवसापूर्वी, गुजरातमधील सुरत न्यायालयाने राहुल गांधींना त्यांच्या विधानासाठी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती आणि उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली आहे .NewsJagar
हे प्रकरण २०१९ शी संबंधित आहे, जेव्हा लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटकात एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले होते, ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे असू शकते’. राहुल गांधींविरुद्धचा हा खटला गुजरातमधील भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी घेतला होता.