लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातल्या बसेस सुरु करण्यासाठी राष्ट्रवादी युवक चे निवेदन

श्री.अमित साखरे,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर

गडचिरोली,दि.२४/०३/२०२३

लांब पल्ल्याच्या गाड्या व ग्रामीण भागामध्ये जाणान्या ऐस टी बसेस काही कारणास्तव बंद करण्यात आलेल्या असून त्या पूर्ववत सुरु करण्यासाठी श्री. रुपेश वलके, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष यांनी निवेदनातर्फे मागणी केलि आहे.

पूर्वी पासून चालत आलेल्या मार्गावरील बंद करण्यात आलेल्या पुर्ण जुने शेडयुल पूर्ववत करण्यात यावे, आणि अशा अनेक लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागामध्ये जाणान्या बसेसची संख्या पुर्वीप्रमाणे पुर्ववत करण्यात यावी. यात प्रामुख्याने
गडचिरोली ते नागपुर, गडचिरोली ते चिमुर ,गडचिरोली ते भामरागड,गडचिरोली ते पखांजूर , गडचिरोली ते संभाजीनगर ,गडचिरोली ते यवतमाळ, गडचिरोली ते सिरोंचा, गडचिरोली ते एटापल्ली, गडचिरोली ते कोरची,धानोरा नागपुर, चामोर्शी नागपुर, घोट नागपुर, काटोल नागपुर, मार्कडा नागपुर, बोरी गडचिरोली, एटापल्ली गडचिरोली, जारावंडी गडचिरोली, पेंढरी गडचिरोली, मानपुर गडचिरोली, मुरुमगाव गडचिरोली इत्यादि बसेस सुरु करण्यात यावे जेणेकरुन नागरीकांना गडचिरोली शहरातुन ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जाणे येणे सोईस्कर होईल.NEWSJAGAR

वरील दिलेल्या मागण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे आदोलन करण्यात येईल. निवेदन देते वेळी रुपेश वलके, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा विधानसभा अध्यक्ष मनोज बेसरकर, विनोद सहारे, हेमराज लांजेवार, विवके कांबळे, अक्षय मेश्राम, समिर भांडेकर, बाबुलाल रामटेके, व अन्य कार्यकर्त्याचा सहभाग होता.