आदर्श महाविद्यालयात शाहिदांना अभिवादन

श्री.भुवन भोंदे, प्रतिनिधी, न्युज जागर 

देसाईगंज, दि.२४.०३.२०२३, ५.०० वा .

आदर्श महाविद्यालमध्ये 23 मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू, सुखदेव याच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांनी पुष्पअर्पण करीत अभिवादन केले.२३ मार्च रोजी दरवर्षी शहीद दिवस साजरा केला जातो. भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देण्याऱ्या भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या स्मर्णार्थ देशभरात शहीद दिवस साजरा केला जातो. २३ मार्च रोजी इंग्रजांनी भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव या भारतमातेच्या वीर जवानांना फाशी दिली होती. त्यांच्या या बलीदानामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली. त्यामुळेच आजचा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.या निमित्ताने महाविद्यालयात त्याच्या विचारांपासून विद्यार्थ्यांनि प्रेरणा घ्यावी यासाठी रोल प्ले ऍक्ट हा कार्यक्रम सादर करण्यात आला.यामध्ये विविध क्रांतिकारकाच्या वेशभूषा लावून महाविद्यालयीन विध्यार्थ्यानी अभिनय स्वरूपात भारत माता, वीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, चंद्रशेखर आझाद, मंगल पांडे आणि पिंगरी व्यंगय्या नायडू या देशभक्तांनी देशासाठी केलेल्या कार्याचे अप्रतिम सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इतिहास विभाग यांच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता इंग्रजी विभागप्रमुख प्रा.डॉ.श्रीराम गहाणे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.निलेश हलामी,प्रा.अमोल बोरकर, प्रा.संजय परशुरामकर यांनी सहकार्य केले.