प्रेसनोट
दि.०१/०४/२०२३
ड्रायव्हर राहुल खोब्रागडे हा निर्दोष उपविभागीय वन अधिकारी (तेंदू) धोंडणे यांची कबुली
वनपरिक्षेत्र अधिकारी नैताम यांची कारवाई चुकीची, गाडीत कोणतेही वन्यजीव प्राण्याचे वस्तु न सापडता तसेच ए. सी. एफ धोंडणे यांना माहिती न देता निर्दोष लोकांची फसवणुक , वन विभागाचे अधिकारी जबाबदार
२० आँगस्ट २०२२ रोजी ड्रायव्हर राहुल खोब्रागडे याची काहीच चुक नसतानां तसेच गाडीत कोणतेही वन्यजीव प्राण्याचे अवयव सापडले नसतानां सुद्धा चिमुर चे वनपरिक्षेत्र अधिकारी नैताम यांनी दारुच्या नशेत तसेच राहुल खोब्रागडे यांनी नैताम ला पैसे न दिल्यामुळे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अंतर्गत कलम २(१६), ९, ३९, ४४, ५०, ५१ भा द वी खोट्या गुन्हात फसविण्यात आले. गाडीत कोणतेही वन्यजीव प्राण्याचे अवयव सापडले नसल्याचे ए.सी.एफ धोंडणे व संपुर्ण वनविभागाचे वन अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती असतांना सुद्धा, ड्रायव्हर राहुल खोब्रागडे वर खोटा गुन्हा दाखल केला. केस चा तपास नियमाप्रमाने ए सी एफ धोंडणे यांनी करायचा आहे परंतु धोंडणे यांनी कोणत्याही आरोपी मुलांचा बयान घेतला नाही.
आदर्श मीडिया एसोसीएशन सोबत बोलतांना ब्रम्हपुरी चे उपविभागीय वन अधिकारी धोंडणे यांनी सांगीतले कि कोणत्याही प्रकारचा पंचनामा त्यांनी केलेला नाही , तसा पुरावा आदर्श मीडिया एसोसीएशन कडे उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र अध्यक्षा प्रियाताई झांबरे यांनी न्युज जागर शी बोलतांना सांगीतले. वनविभागाचे अधिकारी निर्दोष मुलांना खोट्या केस मध्ये अडकवुन वनपरिक्षेत्र अधिकारी नैताम चा बचाव करीत असल्याचे दिसुन येत आहे. वन विभागाचे अधिकाऱ्यांना संपुर्ण घटना माहिती आहे, गाडीत कोणतेही वन्यजीव प्राण्याचे अवयव सापडले नाही आणी नैताम नी दारुच्या नशेत खोटे गुन्हे दाखल केले असतांना सुद्धा वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी कायद्याचे उलंघन करुन पदाचा व खुर्ची चा गैरवापर करतांना दिसुन येत असल्याचे झांबरे यांनी सांगीतले. वन विभाग ब्रम्हपुरी डिवीजन च्या काही भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांची पोल लवकरच प्रियाताई झांबरे या जनतेच्या व न्यायालयाच्या समोर आणून देणार
असल्याचे सांगीतले आहे.
वनविभागाचे कायद्यात गाडी सुपुर्द नाम्यावर सोडण्याची तरतुद असतांना सुद्धा वनविभागाचे अधिकारी धोंडणे हे गाडी सोडण्यास नकार देत आहेत धोंडणे यांनी कोणत्याही प्रकारचा पंचनामा व बयान घेतलेला नाही मग न्यायालयाची दिशाभुल का करण्यात येत आहे ? खुर्ची वर बसुन पदाचा गैरवापर व कायद्याचे उलंघन का करण्यात येत आहे ??
प्रियाताई झांबरे या पुढल्या बातमीत संपुर्ण पुरावे न्युज जागर च्या माध्यमातुन उघड करणार असल्याचे सांगीतले. २१ मार्च ला निवेदन देण्याकरीता गेले असता ACF धोंडणे यांनी गाडी सुपुर्द नाम्यावर सोडण्याकरिता माहिती अधिकार वापस घेण्याची अट का ठेवण्यात आली असावी ? ACF धोंडणे यांना कोणत्या अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार वापस घेण्याकरिता दबाव टाकला असावा याचा खुलासा पुढील भागात पुराव्यानिशी करण्यात येईल ब्रम्हपुरी डिवीजन चा भोंगळ कारभार /भ्रष्टाचार लवकरच शासनाच्या निदर्शनास आणुन देणार आणी निर्दोष राहुल खोब्रागडे वर झालेल्या अन्याया विरुद्ध वाचा फोडुन गरीब राहुल खोब्रागडे व त्याच्या परिवाराला न्याय देऊन नैताम व इतर वन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची तक्रार अपर सचिव मुंबई मंत्रालय यांचे कडे करणार असल्याचे सांगीतले आहे