by Arun Barsagade
नागभीड तालुक्यातील चिखलगाव जवळ लग्न लागल्यानंतर वरात घेऊन येताना M.H.12 K.Q. 0919 या क्रमांकाची मिनी बस पलटी झाली यात जवळपास दहा वऱ्हाडी किरकोळ जखमी झाल्याचे समजते . सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील वऱ्हाड घेऊन सावली तालुक्यातील गेवरा येथून लग्नकार्य आटोपून गावाचे दिशेने निघाले होते तेवढ्यात चिखलगाव नांदगाव हे तीन किलोमीटर अंतर पार करण्यापूर्वी चिखलगाव जवळ बस पलटली व ही घटना घडली . तात्काळ हायवे पोलीस व तळोधी बा.पोलीस दाखल झाले . त्यांनी दोन रुग्णवाहिकेतून शिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णलयामध्ये दाखल करण्यात आले . जखमींचे नावे कडू शकले नाही पुढील तपास ठाणेदार दिनकर शेंडे यांचे मार्गदर्शनाखाली देहारे मेजर , गोवर्धन p.s.I., , संजय मांढरे मेजर , पो. का.उमेश मस्के हे विशेष तपास करीत आहेत.