महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक भोयर यांचे स्वागत तर शेंडे साहेब यांना निरोप

श्री.अरुण बारसागडे ,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर 

तळोधी बा,दि.२७/०४/२०२३

तळोधी बा पोलीस स्टेशन चे ठाणेदार दिनकर शेंडे साहेब यांची चंद्रपूर येथे बदली झाली. व त्यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांनी तळोधी बा. पोलीस स्टेशन मध्ये रुजू होवून कार्यभार सांभाळला. यावेळी सायंकाळी ७.३० वाजता पोलीस स्टेशन तळोधी बा.च्या आवारात नव्याने रुजू झालेल्या ठाणेदार मंगेश भोयर साहेब यांना पुढील वाटचाली बदल शुभेच्छा देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. तर मावळते ठाणेदार दिनकर शेंडे साहेब यांना पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आले. यावेळी शेंडे साहेब यांच्या कार्यशैली वर पत्रकार संघाच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यात आले. व दोन्ही अधिकारी वर्गाला भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.Newsjagar 

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय अगडे, सचिव मोनिल देशमुख, उपाध्यक्ष अरूण बारसागडे,महेश काशीवार,भारत भाऊ चुनारकर, दिवाकरभाऊ कामडी, यशवंतराव कायरकर, यावेळी उपस्थित होते. निरोप व स्वागत समारंभ चे संचालन पत्रकार अरूण बारसागडे यांनी केले.