चामोर्शि कृषी उत्पन्न बाजार समितीत अतुल गण्यारपवार गटाचे एकूण 12 उमेदवार विजयी तर शेतकरी जनशक्ती पॅनल चे 6 उमेदवार विजयी

atul-ganyarpwar
चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्युज जागर 
चामोर्शी, दि. ०१/०५/२०२३
चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत श्री. अतुल गण्यारपवार यांच्या शेतकरी सहकरी पॅनल ने प एकुण १२ जागावर बाजी मारत पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
सेवा सहकारी गटातून अतुल गण्यारपवार गटाचे 10,  हमाल गटातून १ , ग्रामपंचायतून गटातून १ असे एकुण  १२ सदस्य  निवडूण आले तर असून अतुल गण्यारपवार यांच्या पॅनल विरोधात भाजप, कांग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित शेतकरी जनशक्ती पॅनल ने आपले उमेदवार उभे केले होते. यात ग्रामपंचायत गटातून शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, माजी सभापती रमेश बारसागडे अतुल कन्नाकेअसे एकूण 3 , व्यापारी गटातून २ , सेवा सहकारी गटातून १ असे एकूण 6 उमेदवार विजयी झाले. newsjagar   
अतुल गण्यारपवार यांना या निवडणुकीत सर्व शक्तीने रोखण्याचा प्रयत्न झाला असून या सर्वांवर मात करीत त्यांनी आपली पकड पुन्हा अधिक जोमाने सिद्ध करून दाखविली आहे , अतुल गण्यारपवार गटाने या निवडणूकीत बहुमत प्राप्त केले.