======
*आपुलकी फाऊंडेशन नागभीड च्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितर…!!!*
======
नागभीड:
सामाजिक,सांस्कृतिक
क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आपुलकी फाऊंडेशन नागभीड च्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून नागभीड नगरपरिषद परिसरातील शाळेतील इयत्ता पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कुल बॅग व इतर शैक्षणिक साहित्य देण्यात येते.. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या मात्र यावर्षी पासून नियमित पुन्हा सुरू झाल्याने आपुलकी फाऊंडेशन ने यावर्षी सुद्धा आपल्या उपक्रमात सातत्य ठेवले..!!!
आजचे शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम सरस्वती ज्ञान मंदिर नागभीड येथे छोटेखानी कार्यक्रमाच्या माध्यमातून घेण्यात आले.. यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून व्यापारी संघाचे अध्यक्ष गुलजारजी धम्मानी तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य अजयजी काबरा यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष हनिफभाई ज्यादा,आपुलकी चे संचालक मधू भाऊ डोईजड, सरस्वती ज्ञान मंदिर शाळेचे मुख्याध्यापक गोकुल पानसे सर,आपुलकी फाऊंडेशन चे अध्यक्ष विजय बंडावार,सरस्वती ज्ञान मंदिर च्या सहायक शिक्षिका किरण गजपुरे मॅडम,आपुलकी चे संचालक किशोर मुळे यांची उपस्थिती होती…!!!
सर्वप्रथम आपुलकीचे दिवंगत संचालक स्व.मनोज कोहाट यांना आदरांजली वाहण्यात आली… यानंतर सरस्वती ज्ञान मंदिर नागभीड च्या वर्ग सातवीच्या मुलींनी स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत केले.यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजयजी काबरा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या… अजयजी काबरा यांनी आपल्या मनोगतातून आपुलकी फाऊंडेशन या सामाजिक उपक्रमाचे अभिनंदन केले.. आपुलकी चे नवनियुक्त संचालक नरेश ठाकरे, सचिन वाकुडकर,संचालिका नंदा राखडे मॅडम यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व यानंतर इयत्ता पहिलीत प्रवेश करणाऱ्या सर्व मुलांना स्कुल बॅग व इतर साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.. यानंतर आपुलकी फाऊंडेशन च्या वतीने जि.प.बेसिक शाळा नागभीड,जिल्हा परिषद कन्या शाळा नागभीड,जि.प.प्राथमिक शाळा शिवनगर,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोंगरगाव या ठिकाणी सदर शाळेत जाऊन बॅग वितरण करण्यात आले..!!!
सदर कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील नवघडे सर यांनी केले तर प्रास्ताविक पराग भानारकर सर तर आभार किरण गजपुरे मॅडम यांनी मानले…!!
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपुलकी चे संचालक राजू भाऊ ठाकरे,स्वप्नील नवघडे,महेश ठाकरे,सचिन वाकुडकर,नरेश भाऊ ठाकरे,पवन नागरे,पराग भानारकर, सतीश जीवतोडे,प्रकाश जांभूळे,मुकेश लांजेवार,संचालिका माया सहारे मॅडम,शीतल दीघाडे मॅडम,,नंदा राखडे मॅडम,मनीषा पुंडे मॅडम,दीप्ती मडावी मॅडम, तसेच सरस्वती ज्ञान मंदिर चे सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष प्रयत्न केले…!!!!
========