श्री.विलास ढोरे , वडसा तालुका प्रतिनिधी,न्युज जागर
देसाईगंज,दि.१२/०५/२०२३
येथिल शेतकरी क्रुषी केंद्राचे संचालक तथा माजी नगरसेवक कोराना काळापासून सोनु सूद म्हणून प्रसिद्ध असलेले सामाजिक कार्यात हिरहिरीने सहभाग घेणारे श्री गणेश फाफट यांनी 34 व्या वेळी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
स्थानिक वन विभाग कार्यालय आरमोरी रोड येथिल सिंधू भवन येथे संत निरंकारी चेरीटेंबल फौंडेशन दिल्ली शाखा देसाईगंज च्या वतीने आयोजीत रक्तदान व रोगनिदान शिबिर दरम्यान श्री फाफट यांनी 34 व्या वेळी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेत अनेक जण रक्तदान करीत असल्याचे दिसून आले