पक्ष वाढीसाठी काँग्रेसी विचारधारेच्या महिलांनी एकजुटीने काम करावे -आढावा बैठकीत ॲड. कविता मोहरकर यांच्या सुचना

श्री.भुवन भोंदे,प्रतिनिधी,वडसा 

देसाईगंज,दि.१२/०५/२०२३

देशात सद्या स्थितीत अराजकतेचे वातावरण निर्माण झाले असुन सर्वच स्तरातील लोकं स्वतःला असुरक्षित मानु लागले आहेत. यात महिलांची प्रचंड मुस्कटदाबी होत असली तरी महिलांचा असंघटित पणा यास जबाबदार असुन महिलांचे अधिकार काँग्रेसच अबाधित राखु शकते असा ज्या महिलांचा विश्वास झाला आहे त्या काँग्रेस पक्षाशी जुळवून घेऊ लागल्या आहेत.त्या अनुषंगाने पक्ष वाढीसाठी काँग्रेसी विचारधारेच्या महिलांनी एकजुटीने काम करण्याच्या सुचना गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा ॲड.कविता मोहरकर यांनी देसाईगंज येथील विश्रामगृहात आयोजीत पक्षाच्या महिलांच्या आढावा बैठकीत दिल्या. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते पिंकुभाऊ बावणे,पुष्पा कोहपरे,समिता नंदेश्वर,रजनी आत्राम,विमल मेश्राम,पद्मा कोडापे,रूपलता बोदेले, शेहेनाज पठाण,बेबी पठाण आदी काँग्रेस कार्यकर्ते, महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होत्या. दरम्यान ॲड.कविता मोहरकर यांनी आढावा बैठकित शहरात पक्षाची एकंदरीत स्थिती व महिलांच्या अडचणी,समस्या जाणून घेतल्या.मार्गदर्शन करताना वाढलेल्या प्रचंड महागाईत सर्व सामान्य गोरगरीब होरपळून निघत असुन घर सांभाळणाऱ्या गृहिणींना यांची चांगलीच जाणीव होऊ लागली आहे.अशात ही स्थिती पुर्ववत आणण्यात काँग्रेसच सक्षम असल्याची विचारधारा असलेल्या असंख्य महिला पक्षाची विचारधारा समजुन घेऊन काँग्रेसचा झेंडा हाती घेऊ लागल्या आहेत.माञ गटागटात विखुरल्या असल्याने नारी शक्ती कमी पडु लागल्याचे दिसुन येत आहे. महिलांच्या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असुन कमजोरीचा फायदा घेतल्या जात असल्याने महिलांनी आपल्या न्याय हक्काची लढाई लढणे आता क्रमप्राप्त ठरू लागले आहे.यासाठी काँग्रेसच पर्याय असल्याचे स्पष्ट होऊ लागले असल्याने अशा विचारधारेच्या महिलांना सोबतीला घेऊन पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या उपस्थित महिलांना सुचना केल्या.