विद्युत करंट लागून गोसेखुर्दच्या कामावर काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू., कंपनीचा दुर्लक्षितपणा जबाबदार

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर 

नागभीड,दि. १५/०५/२०२३

आलेवाही येथील घटना.

नागभीड तालुक्यातील आलेवाही खरकाडा या गोसेखुर्दच्या कॅनल नंबर २ वर काम करणाऱ्या जीवनापूर येथील राहुल दिवाकर चिमलवार (वय २५ )या कामगाराचा काम करताना सकाळी ९.३० च्या सुमारास विद्युत करंट लागून मृत्यू झाला.
घटनेची हकीकत अशी आहे की सदर कामगार राहुल दिवाकर चीमलवार मागील दोन वर्षापासून नवभारत या कंपनीचे गोसेखुर्दचे कॅनल नं.२ वर काम करणाऱ्या कंपनीमध्ये कामावर होता. कंपनीचे काम आलेवाही ते खरकाडा येथे गोसेखुर्दचे काम चालू आहे. रोजच्या प्रमाणे कंपनीकडून मजुरीचे काम करीत होता. कॅनल वरून जवळपास १० फुट अंतरावर विद्युत तारेची लाईन गेलेली आहे त्याकडे कंपनीचे दुर्लक्ष होते. त्यासाठी कंपनीने मजुराला कोणत्याही प्रकारची सुरक्षा कवच दिले नसल्याने हा अपघात झाला असा येथील नागरिकांचा आरोप व्यक्त होत आहे.
सायंकाळी ७ वाजेपर्यंत मृतदेह मृतकाच्या नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी कंपनीच्या जीवणापूर स्थित कार्यालयात ठेवलेला होता . जोपर्यंत कंपनीकडून समाधानकारक मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी गावकऱ्यांची मागणी आहे. यावेळी कंपनीचे सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते. तेव्हा काही लोकांनी हस्तक्षेप करून कंपनी कडून काही मदत मिळवून दिल्याचे कळले आहे. newsjagar
राहुलच्या अचानकपणे अपघाती जाण्याने चिमलवार परिवारात व गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.