श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
नागभीड , दि.१६/०५/२०२३
गिरगाव येथील श्रीलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व श्री.विनोद पा.बोरकर मित्र परीवार जतन फाउंडेशन पुणे तसेच ग्राम काँग्रेस कमिटी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्रतपासणी व लगेच चष्मेवाटपाचा कार्यक्रम दि.१६/०५/२०२३ ला संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाकरीता उदघाटक म्हणून प्रफुलभाऊ खापर्डे मा. सभापती पं. स. नागभीड, अध्यक्ष म्हणून श्रीलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.विनोद बोरकर,प्रामुख्याने उपस्थित जि.प.चे माजी सदस्य खोजराम मरस्कोल्हे,नांदेडचे सरपंच मुर्लिधर गौरकर,गिरगावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रा.पं.सदस्य श्री.शरदराव सोनवाने,श्रीलक्ष्मी पतसंस्था गिरगांवचे उपाध्यक्ष गुरूदासजी चावरे,गिरगावचे माजी सरपंच प्रशांत गायकवाड,पत्रकार संजय अगडे,सादिक शेख नांदेड, परमेश्वर मडावी नांदेड निकेश नेवारे कच्चेपार मुकेश रामटेके नांदेड आदी उपस्थित होते.
सदर शिबिरात 550च्या वर नागरिकांनी अधिकृत नोंदणी करून तपासणी केली.त्यातील काही लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नव्याने शिबीर आयोजित करण्याचे मत यावेळी विनोद बोरकर यांनी केले.विशेष म्हणजे डोळे तपासणी झाल्याबरोबर लगेच चष्माचे वाटप केल्यामुळे शिबिरात नोंदणी झालेल्या सर्वसामान्य जनतेनी समाधान व्यक्त करत गावातील श्रीलक्ष्मी,श्री.विनोद बोरकर तसेच जतन फाउंडेशन पुणे यांचे विशेष आभार मानले.
सदर शिबिरात तपासणीअंती 415रुग्णांना चष्मे वितरित करण्यात आले.यावेळी संपूर्ण नागभीड तालुक्यात वेगवेगळ्या गावात नेत्रतपासणी करून १०,००० चष्मे मोफत वाटू असे आश्वासन विनोद बोरकर यांनी दिले.
सदर कार्यक्रमाचे संचालन दुर्गेश रामटेके तर आभार अलीम शेख यांनी मानले
या कार्यक्रमाला महिलांची व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.