श्री.अमित साखरे , गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
गडचिरोली, दिनांक १६ मे २०२३
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे यांचे आमदार डॉ देवरावजी होळी निवेदन
आलापल्ली येथील वन परिक्षेत्राधिकारी श्री. योगेश शेरेकर यांनी पेरमिली वनपरिक्षेत्रात अतिरिक्त चार्ज वर असताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड तसेच अनेक नियमबाह्य कामे करून शासनाची आर्थिक फसवणूक केलेली असल्याचे निदर्शनास येत असून त्यांच्या या कार्यकाळातील कामांची चौकशी करून त्यात झालेल्या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची सखोल करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी केली आहे. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे यांनी आमदार महोदयांना याबाबतचे निवेदन दिले व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
आलापल्ली वनपरिक्षेत्रात मार्च २०२२ मध्ये तसेच त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात गुरे प्रतिबंधक चर खोदकामात जेसीबी व इतर यंत्राच्या सहायाने कामे करून बोगस मजुरांच्या नावे खोट्या स्वाक्षरी करून व खोटे व्हाऊचर बनवून शासनाच्या लाखो रुपयांची अफरातफर केली असल्याचे निदर्शनास आले आहे. या खोदकामात मोठ्या प्रमाणत आर्थिक अनियमितता भ्रष्टाचार, बनावट मजूर बनावट कागदपत्राचा वापर करून वरीष्टाची तथा शासनाची दिशाभूल केलेली आहे. त्यांनी केलेल्या या कार्यकाळातील कामाचे अंदाजपत्रक मोजमाप पुस्तिका व काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, मजुरांचे हजेरीपटाची त्यांच्या कार्यकाळात झालेल्या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.