देसाईगंज येथे दस्त नोंदणी साठी दुय्यम निबंधक भेट कार्यालय मंजूर

श्री.विलासजी ढोरे वडसा तालुका प्रतिनिधी,न्युज जागर

देसाईगंज,दि.१७/०५/२०२३

महसूल मंञ्यांकडुन हिरवी झेंडी,आमदार गजबेंच्या मागणीला यश

अतिदुर्गम,अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यातील प्रगत शहर म्हणून देसाईगंज शहराचा नावलौकिक असला तरी शहरात दुय्यम निबंधक कार्यालय नसल्याने येथील नागरिकांना दस्त नोंदणीसाठी आरमोरी येथे हेलपाट्या मारव्या लागतात. शहरवाशियांची ही गंभीर समस्या लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीला अखेर यश आले असुन देसाईगंज येथे दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालय भेट कार्यालय मंजुर करण्यात आल्याने आमदार गजबे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
देसाईगंज येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय असुन या उपविभात आरमोरी तालुक्याचा समावेश आहे.देसाईगंज शहर हे औद्योगिक व ब वर्ग नगर परिषदेचे शहर आहे.माञ येथे दुय्यम निबंधक कार्यालय नसल्याने शहर व तालुक्यातील नागरिकांना दस्त नोंदणीसाठी ३५ किलोमीटरची पायपीट करत आरमोरी येथे जावे लागत आहे.

दरम्यान देसाईगंज तालुक्यातील नागरीक सर्वाधिक दस्त नोंदणी करीत असले तरी यासाठी नागरिकांचा वेळ,श्रम,पैशाचा अपव्यय होत असुन प्रवासाच्या तुरळक साधनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.यास्तव देसाईगंज येथेच दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालय व्हावा अशी मागणी जोर धरू लागली होती. देसाईगंज शहरासह तालुक्यातील नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे महसूल मंञी ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे येथील समस्या अवगत करुन देऊन दुय्यम निबंधक कार्यालय देण्याची मागणी केली होती.त्या अनुषंगाने महसूल मंञ्यांनी हिरवी झेंडी दिली असल्याने देसाईगंज येथे लवकरच दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक भेट कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याने यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहुन समस्या मार्गी लावल्याबद्दल आमदार गजबेंचे सर्वच स्तरातून आभार व्यक्त केले जात आहे.newsjagar