लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार , युवकावर गुन्हा दाखल

श्री.अरुण बारसागडे ,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर 

माजरी   दि.१७.५.२३

लग्नाचे आमिष दाखवून जीवनभर सोबत राहण्याची बतावणी करून आरोपीने एका २२ वर्षीय युवतीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना माजरी ठाण्यांतर्गत घडली आहे.

गुलाम साबरी सिद्दीकी (२२) याची ओळख एका २२ वर्षीय युवतीशी झाली. दोघांची मैत्री झाली. बातचीत करताना त्यांची मैत्री प्रेमात बदलली. त्यांचे नियमित भेटणे सुरू झाले. त्यानंतर आरोपी युवकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून जीवनभर सोबत राहण्याची बतावणी केली. युवतीनेही त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर युवकाने दफाई नंबर १ मथील आपल्या राहते घरी बोलावून तिला शरीरसुखाची मागणी केली. युवक लग्न करणार असल्यामुळे तिनेही त्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला.NewsJagar

आरोपी युवकाने ५ जानेवारी २०२० ते १० मे २०२३ दरम्यान वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर युवतीने लग्नासाठी हट्ट धरला असता आरोपी युवकाने परिवाराची जवाबदाऱ्या सांगून लग्न करण्यास टाळले व सरळ हात वर केले. आरोपी खोटे आश्वासन देऊन वारंवार आपल्या सोबत लैंगिक संबंध प्रस्तापित केल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे समजताच युवतीने विष प्राशन केले. दरम्यान फिर्यादीचे बहीणीने तिला चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल केले. दरम्यान फिर्यादीची प्रकृती बरी झाल्यानंतर तिने माजरी पोलीस ठाणे गाठून आरोपी विरुद्ध तक्रार दिली. दरम्यान मंगळवारी दुपारी माजरी पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध अप. क्र.५४/२३ कलम ३७६, ३७६ (२) (एन ) अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि अजितसिंग देवरे, पोहवा. गजानन जुमडे, हरिदास चोपणे करीत आहे.