न्यूज जागर वृत्तसेवा
चामोर्शी, दि.२४/०५/२०२३
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी दरम्यान पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी
श्री. अतुल गण्यारपवार यांना मारहाण केली होती, या प्रकरणी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले आहे. court oders to register offence on pi khandve
२० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास चामोर्शी पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी अतुल गण्यारपवार यांना मारहाण केली होती. या मारहाणीत गण्यारपवार यांचा डावा हात फ्रॅक्चर झालेला होता. पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदवावा तसेच बडतर्फ करण्यात यावे यासाठी चामोर्शी येथे आंदोलन झाले होते. पण अतुल गण्यारपवार यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद न झाल्याने त्यांनी अँड. ठाकरे यांच्यामार्फत चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात धाव घेत ॲड. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. केदार यांनी गण्यारपवार यांच्या वतीने बाजू मांडली. २० मे रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर कलम 294, 324, 326 342 भादंविनुसार गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले असल्याची माहिती असून 9 जून रोजी सुनावणी होणार असल्याचे कळले आहे.
कायदा हा सर्वांसाठी सारखाच असतो याची प्रचिती झाली, सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिलेली असून आता नागरिकांचे पुढील सुनावणी ला काय होणार ? आता याकडे लक्ष लागलेले आहे.